Inspirational Blog : जगाचा शांतीदूत !

by - 2:03 AM

३० जानेवारी ( हुतात्मा दिन ) आणि गांधीजींची पुण्यतिथी
त्यानिमित्त हा लेख गांधीजींना समर्पित ...


केदार भोपे.

८०५५३७३७१८

kedarsmoto@gmail.com

जगाचा शांतीदूत !


महात्मा गांधी एक अशी व्यक्ती जिच्यामुळे भारतीय स्वतंत्र लढा जगाच्या इतिहासात अजरामर झाला. शांतीच्या मार्गाचा अवलंब केल्यास आपण संपूर्ण जगाला जिंकू शकतो हेच गांधीजींनी आपल्या आचरणातून सर्वाना दाखवून दिले. महात्मा गांधी हे भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख नेते, आणि भारतीय स्वतंत्र लढ्यात लढणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीत राहणाऱ्या सर्व सामान्य भारतीयांचे प्रमुख आशास्थान होते. 




महात्मा गांधींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. रविंद्रनाथ टागोरांनी त्यांना महात्मा हि उपाधी दिली आहे. भारतातील लोक प्रेमाने त्यांना बापूजी म्हणत. महात्मा गांधी हे सत्याग्रहाचे जनक होते.असहकार आणि अहिंसेच्या मार्गावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केला.प्रथम वर्गाचे तिकीट असतांना सुद्धा रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना तृतीय वर्गात बसण्यास सांगितले. गांधीजींनी नकार देताच त्यांना रेल्वे च्या डब्यातून ढकलून देण्यात आले.अशा प्रकारे वंशभेद व असमानतेला सामोरे गेल्यावर गांधीजींनी तेथील भारतीयांना एकत्रित करून सरकार विरोधात आंदोलने सुरु केली. यामध्ये त्यांना अनेकदा पोलिसांचा मार खावा लागला, अनेकदा तुरुंगवास हि झाला. परंतु या त्रासाला न जुमानता त्यांनी सरकारला नामोहरम करून सोडले. त्यांच्या या अहिंसक चळवळीची दाखल शेवटी सरकारला घ्यावीच लागली . हीच तर खरी गांधीजींच्या अहिंसक चळवळीची सुरुवात होती.

त्यानंतर १९१५ साली भारतात परत आल्यानंतर गांधीजींनी भारतीय स्वतंत्र लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. गांधीजींच्या सत्याग्राच्या अहिंसक आंदोलनाला भारतातील पहिले यश चंपारण आणि खेडमधील सत्याग्रहात मिळाले.चंपारण मधील ब्रिटीश जमीनदार शेतकऱ्यांना जबरदस्तीने निळ उत्पादन करायला लावत आणि त्याप्रमाणात त्याचा मोबदला देत नसत. अशी शेतकऱ्यांची गरिबीची परिस्थिती असतांना त्यातल्यात्यात वरून दुष्काळाची भर असतांना हेच जमीनदार शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने कर वसूल करत. त्याविरोधात गांधीजींनी सत्याग्रह आणि असहकार आंदोलन यशस्वी करून दाखवत सरकारला शेतकऱ्यांचा कर माफ करायला भाग पाडले. गुजरातमधील खेडा मध्ये गांधीजींनी त्यांच्या सर्व अनुयायांना एकत्र करत एक आश्रम उभारून गावातील स्वच्छता, गावामध्ये शाळा रुग्णालये उभारून गावामध्ये विकासकामे करण्यास सुरुवात केली असता पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांना तो प्रदेश सोडून जाण्यास सांगितले तेव्हा हजारो लोकांनी गांधीजींच्या सुटकेसाठी पोलीस स्टेशन आणि न्यायालयावर मोर्चे काढले आणि सरकारच्या या कृतीचा निषेध केला. शेवटी न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत गांधीजींना सोडून दिले.

गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. परंतु गांधीजींनी जालियनवाला हत्याकांड आणि त्यनंतर च्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला. गांधीजींच्या तत्वानुसार हिंसा म्हणजे पाप होती. या हत्याकांडानंतर गांधीजींनी आपले संपूर्ण लक्ष स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या स्वराज्याच्या कल्पनेत वयक्तिक, धार्मिक, आणि राजकीय प्रकारचे पूर्ण स्वतंत्र समाविष्ट होते. डिसेंबर १९२१ मध्ये त्यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे सर्वाधिकार मिळाल्यानंतर फक्त उच्चभ्रूंसाठी समजल्या जाणाऱ्या या पक्षाचे संपूर्ण रूप बदलले आणि कॉंग्रेस जन सामान्न्यांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष बनला. गांधीजींनी अहिंसेच्या तत्वाला स्वदेशी ची जोड दिली. यामागे भारतीयांनी परदेशी वस्तूंवर संपूर्णतः बहिष्कार टाकून भारतातील वस्तूंचा वापर करावा असा हेतू होता. प्रत्येक भारतीयाने स्वतंत्र लढ्याच्या समर्थनार्थ चरख्यावर रोज थोडे तरी सुत कातावे असा त्यांचा आग्रह होता. हि चालवल जोमात असतांना उत्तर प्रदेशातील चौरी चौरा गावात याला लढ्याला हिंसक वळण मिळाले.आणि गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अजून हिंसक घटना घडू नयेत म्हणू गांधीजींनी आंदोलन स्थगित केले.

त्यानंतर गांधीजींनी दांडी यात्रेच्या मध्माध्यामातून इंग्रजांना मोठा धक्का दिला. सत्तर हजाराहून अधिक लोक यात सहभागी झाले तर ६०,००० लोकांना यात अटक झाली आणि नंतर वाटाघाटी करून या सर्व लोकांना सोडून देण्यात आले.यादरम्यान अनेकदा गांधीजींवर प्राणघातक हल्ले झाले परंतु कुठल्याही परिस्थितीला न डगमगता त्यांनी आपला अहिंसक लढा चालूच ठेवला. १९३९ साली जर्मनीने पोलंडवर आक्रमण करून दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली. जसे जसे महायुद्ध पुढे सारकत गेले तसे तसे गांधीजींनी स्वातंत्र्याची मागणी लावून धरली. या दरम्यान गांधीजींनी एक ठराव मांडून इंग्रजांना “भारत छोडो “ असे ठणकावून सांगितले. हा गांधीजींचा ब्रिटिशांना भारत सोडून जा असा स्पष्ट व अंतिम प्रयत्न होता. स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी “भारत छोडो” चळवळीचा सर्वात प्रभावी पणे वापर केला. यात लाखो लोकांना अटक झाल्या, हजारो लोकांवर गोळ्या चालवल्या गेल्या. आणि गांधीजींनी इंग्रजांना स्पष्टपणे सांगितले कि भारताला स्वतंत्र दिल्याशिवाय भारत दुसऱ्या महायुद्धात मदत करणार नाही. असे सांगून त्यांनी भारतीयांना “करो या मरो” हा मूलमंत्र दिला. १९४३ ला दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारताला स्वतंत्र देण्याचे स्पष्ट केल्यानंतर गांधीजींनी आपले आंदोलन मागे घेतले. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी भारताची फाळणी करत भारताला स्वतंत्र दिले.

३० जानेवारी १९४४८ ला दिल्लीतील बिर्ला भवनाच्या बागेतून फिरत असतांना नथुराम गोडसे नामक माथेफिरू णे त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. जागला शांततेचा, अहिंसेचा मार्ग दाखवणारे सर्वांचे लाडके बापू सर्वांना सोडून गेले. आज बापू आपल्यात नाहीत परंतु त्यांचे विचार, आचार अजरामर असून संपूर्ण जगाला शेवट पर्यंत उपयोगी पडणारे आहेत. जगातील अहिंसक आंदोलनाचे जनक असणाऱ्या या महात्म्याला आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधीजींना भावपूर्ण आदरांजली.

You May Also Like

0 comments