I LOVE TO DESIGN

I AM

image
Hello,

I'm Kedar Bhope

Kedar Bhope started his media career in 2013 as a freelance reporter. He later joined Prabhat, a Marathi Daily, in Ahmednagar. In 2015, he joined as Sub-editor at Pudhari, a leading Marathi Daily in Ahmednagar.

Kedar Bhope is also Owner of Mitra Publicity. Mitra Publicity offer it's customer Web Designing Services from last 8 years.


Education
University of Pune

Bachelor of Business Administration

Tilak Maharashtra University

Master of Journalism

Tilak Maharashtra University

Bachelor of Journalism


Experience
Owner

Mitra Publicity

Past City Reporter

Daily Prabhat

Sub-editor

Daily Pudhari


My Skills
Web/ Blog Design
Journalism
Branding
Marketing

4+

Awards Won

120+

Happy Customers

340+

Projects Done

5768

Photos Made

WHAT CAN I DO

Web Design

We offer a wide variety of website design services.

Responsive Design

We have the capability of featuring websites over desktop, smartphones and tables alike with responsive web design services

Graphic Design

Pictures speak louder than words and thus, we create graphics that define businesses’ services in the best possible way.

News

Kedar, only provide news related services for Daily Pudhari.

Video Broadcasting

We Provide Video Broadcasting services from our Youtube Channel.

Unlimited Support

Ensuring your business runs smoothly and risk free all year round. Takes care of your IT Support needs 24/7, Easy Communication, and Fast Turnaround.

SOME OF WORK

साने गुरुजी जयंती


साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांची आज जयंती
त्यांच्या पवित्र स्मृतीस छात्रभारती अहमदनगर तर्फे विनम्र अभिवादन !!!!
स्वातंत्रसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक अशा अनेक प्रकारे भारतीयांच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे फक्त आणि फक्त साने गुरुजी
१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’

त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते.ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात.त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. आजही त्यांच्या कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. साने गुरुजींनी स्फुर्तिदायी कविता लिहिल्या, ‘श्यामची आई’ सारखी सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिली; त्यांनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

त्यांच्या जयंतीनिमित्त छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांना विनम्र अभिवादन ....
केदार भोपे
शहराध्यक्ष अहमदनगर

धगधगत्या दिल्लीतील असंतोष .....!!!! The Anna Effect ....

धगधगत्या दिल्लीतील असंतोष   .....!!!!
The Anna Effect ....
दिल्लीत चालत्या बसमध्ये बलात्कार झालेल्या पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी सलग सातव्या दिवशीही तरुणांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. मात्र शांतीपूर्ण चाललेल्या आंदोलनला आज हिंसक वळण मिळालं. पोलिसांनी आज सकाळी संपूर्ण परिसरात जमावबंदी लागू केली पण जमाव येतच राहिला. पोलीस आणि आंदोलकांध्ये आज दिवसभर धुमश्चक्री सुरु आहे.
अन्ना हजारे यांनी मागील वर्षी दिल्ली येथे जनलोकपाल कायद्याच्या मागणी साठी आंदोलन केले होते. त्यात त्यांनी संपूर्ण देशाला आपल्या मागणी आणि हक्कांसाठी पेटून उठण्याची हाक दिली होती. त्याचीच प्रतिक्रिया आठ दिवसांपासून दिल्लीत उमठत आहे.  जनतेवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे लोक आता दिल्ली मध्ये आंदोलन करीत आहेत ते ना कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ना प्रचारक पण फक्त माणुसकीच्या भावनेतून जनतेचा रोष प्रकट करण्यासाठी हे लोक जमले आहेत. आपण जर दोन वर्ष मागे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल कि जनतेवर होणार्या अन्याया संदर्भातील जनतेचा रोष हा फक्त आणि फक्त राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या वेळी दिसून येत होता. परंतु त्यातही राजकारण असल्याने सामान्य जनता कधीही त्यात सहभागी झाली नव्हती. परंतु अन्ना हजारे यांनी दोन वर्षांपासून चालविलेल्या देशव्यापी जन जागरण मोहिमेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या हक्कांसाठी लढण्याची हि ताकद, हि स्फूर्ती फक्त अण्णांच्या आंदोलनामुळे सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे.
कितीही अन्याय झाला तरी नेहमी गप्प असणारा सामान्य माणूस ( आम आदमी ) आज त्याच अन्यायाला त्याच जोराने प्रतिकारही करीत आहे. हीच प्रतिकार करण्याची, पेटून उठण्याची ताकद / धमक अण्णांच्या आंदोलनाने जनतेमध्ये निर्माण झाली आहे. नेहमी अन्यायाच्या वेळेस शांत राहणारा एक मोठा वर्ग यामुळे पेटून उठला आहे.यापुढे सरकार ला सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहावे लागणार आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारला येथून पुढे या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार  आहे. कारण भारतातील जनता आता जागृत झालेली आहे.

 इंडिया गेटजवळ जमलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरासोबतच लाठीचार्ज केला. पण तरीही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. पोलिसांच्या कारवाईनंतर संतप्त झालेल्या आंदोलनकांनी उत्तर म्हणून पोलिसांवर दगडफेक केली. तर काही आंदोलकांनी 26 जानेवारी निमित्त तयार करण्यात आलेल्या बेंचची जाळपोळ केली. इंडिया गेटच्या परिसरात संतप्त आंदोलकांनी एक खासगी कार उलटवून लावली. पोलिसांच्या वाहनाची प्रचंड तोडफोड केली. पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. तर पोलिसांनी प्रसारमाध्यमांवर सुद्धा आसुड उगारला. पत्रकारांवर पाण्याचा मारा करण्यात आला असून पत्रकारांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शांततापूर्ण आंदोलन करावे तोडफोड करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं.


चुकीच्या प्रश्नाचे गुण वाढवून मिळावेत

मा. संचालक , दि.०५/१२/ २०१२
पुणे विद्यापीठ उपकेंद्र,
अहमदनगर.
विषय- एम ए च्या प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नाचे गुण वाढवून मिळणे बाबत.....
महोदय,
पुणे विद्यापीठातर्फे गेल्या नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम सत्र परीक्षेत एम ए. मराठीच्या भाषाविज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न टाकूविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. एकूण ८० मार्कांचा हा पेपर होता त्यामध्ये १६ मार्कांचा हा अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना गोंधळात टाकले आहे.
विद्यापीठाच्या या प्रश्नपत्रिकेतील चुकीमुळे विद्यार्थ्यांना ५ टक्क्यांचा फटका बसणार आहे. गुरुवारी दिनांक २२ नोव्हेंबर ला झालेल्या 'भाषाविज्ञान- वर्णनात्मक व सामाजिक' या विषयाच्या पेपर मध्ये 'पदाची घटना म्हणजे काय? ते सांगून, स्वरूप स्पष्ट करा' असा एकूण १६ गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात विचारण्यात आला होता. मात्र, अभ्यासक्रमामध्ये कुठेही हा भाग नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडविता आलेला नाही. या प्रश्नाला पर्यायी अर्थसंकल्पाचा प्रश्न होता. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची तयारी केली नव्हती त्यांचे मात्र या प्रश्नामुळे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
पद म्हणजे गीत असाही अर्थ होतो. त्यामुळे ही गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी पद, पदीम, पदांतर ऐवजी भाषाविज्ञान मध्ये रूप,रुपिम,व रुपिकांतर तसेच स्वन, स्वनिम, स्वनांतर ही व्यापक संकल्पना भाषावैज्ञानिकांनी वापरात आणलेली आहे. पुणे विद्यापीठानेही २००० सालच्या अभ्यासक्रमात हा बदल अमलात आणलेला आहे. त्यामुळे पदाच्या घटनेबाबतचा प्रश्न चुकीचाच असून या प्रश्नाचे सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना संपूर्ण गुण देण्यात यावे. अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत.
तरी आमच्या या मागणीचा गंभीरपणे विचार करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा निकालानंतर जर गुण न मिळाल्याचे लक्षात आल्यास छात्रभारती च्या नेतृत्वाखाली एम ए चे संपूर्ण विद्यार्थी व संघटनेचे कार्यकर्ते मिळून उपकेंद्राचे कामकाज बंद पाडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील व नंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी संपूर्णतः विद्यापीठावर राहील याची आपण दखल घ्यावी.
आपला,
केदार भोपेअहमदनगर मधील उदासीन नगरसेवकांचा निषेध

Start Work With Me

Contact Us
Kedar Bhope
+91 8055373718
Ahmednagar, Maharashtra, India

Pages

Like us on Facebook