जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराला छात्रभारती चा दणका.....!!!!

by - 8:20 AM



कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई आणि आर टी ई. च्या अटी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्षा मोनिकाताई राजळे यांनी गट शिक्षणाधिकारी यांना दिले. अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. शिक्षकांच्या बेजबाबदार वागण्याने आणि अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पालकांचा खाजगी शाळांकडे कल वाढत आहे. परंतु सर्वच विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत पाठविणे पालकांना आर्थिक दुर्ष्ट्या परवडणारे नाही. जिल्हा परिषदेच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात जिल्हा परिषद अपयशी ठरत आहे. या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ दिनांक २५ मार्च रोजी होणार्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचे निवेदन देताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने लक्ष देणे गरजेचे असताना शिक्षण समिती सदस्य मात्र आरोपांची चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. पालकांनी छात्रभारती कडे केलेल्या तक्रारीनुसार छात्रभारती तर्फे आज शिक्षण समितीच्या बैठकीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिकाताई राजळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्या मागण्या खालीलप्रमाणे -
विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी.
शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला पोषण आहार मिळालाच पाहिजे.
कामचुकार पणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालीच पाहिजे.
आदि मागण्या छात्रभारती तर्फे करण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष केदार भोपे, तालुकाध्यक्ष योगेश गेरंगे, अझहर सय्यद, गणेश भोकरे, अजिंक्य काळे, प्रदीप देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







You May Also Like

0 comments