Wednesday, November 27, 2013

विस्तारित विद्यापीठ उपकेंद्रासाठी आता पाठपुरावा करणार - प्रशांत गडाख


राज्य पात्रता परीक्षा (सेट ) नंतर आता पुणे विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट येथील विस्तारित विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आता सर्वांना बरोबर घेऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुळा एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांनी केले. छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आज सेट केंद्र नगरला होण्यासाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले अशा सर्वाचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते .


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सिनेट सदस्य प्रशांत गडाख, शिवाजी साबळे, डॉ अरुण पंदारकर, न्यू आर्ट्स चे प्राचार्य डॉ बी एच झावरे, उपकेंद्राचे संचालक डॉ एस एस रीधे , दैनिक सकाळ चे निवास संपादक बाळ ज बोठे, बातमीदार प्रदीप पेंढारे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे जेष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे आणि माध्यमिक शिक्षक भारती चे सुनील गाडगे हे ही उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे, विद्यापीठ प्रतिनिधी प्राजक्ता पवार, अनिल गवते, गणेश शेळके, जीशान पठाण, बलभीम कर्डिले, अझहर शेख, सुहास तोरडमल, अजिंक्य काळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Journalist. Sub-Editor at Daily Pudhari. | also A Web/ blog Designer. At Mitra Publicity.

0 comments:

Post a Comment

Start Work With Me

Contact Us
Kedar Bhope
+91 8055373718
Ahmednagar, Maharashtra, India

Pages

Like us on Facebook