Budget Blog : अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना "बाबाजी का ठुल्लू" …

by - 5:08 AM

अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना "बाबाजी का ठुल्लू" …
नुकताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे.
लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सर्वांना खुश करणारा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु आपण जर हा अर्थसंकल्प वाचला तर यामध्ये संपूर्ण अर्थसंकल्पात कुठेही विद्यार्थी हा शब्द चा उल्लेख पण केलेला नाही. यावरून राज्य सरकार हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे हे लक्षात येते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठलीही तरतूद नसलेला हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त मतदारांना खुश करण्याचा एक प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षांपासून ओ बी सी विद्यार्थ्यांची जवळपास ८ हजार कोटींची शिष्यवृत्ती बाकी आहे. गेली ४ वर्ष सरकार फक्त विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्तीची थकबाकी देऊ अशी पोकळ आश्वासने देत आहे. परंतु कारवाई च्या नावाने शून्य !!


राज्यातील अनेक सरकारी शाळांची दुरवस्था झाली आहे. सरकारी शाळा खासजी शाळांच्या तुलनेत कमी पडत आहेत. त्यांना अनुदान देणे गरजेचे आहे. शालेय पोषण आहार योजने मध्ये पैशाच्या अभावामुळे निकृष्ट दर्जाचा पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळत आहे. अनेक सरकारी शाळांच्या इमारती या सरकारनेच धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत त्या ठिकाणी नवीन इमारती उभ्या करणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु करणे गरजेचे आहे. सरकारी शाळांमध्ये ई लर्निंग उपक्रम सुरु करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. वरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्र्यांनी कुठलीही तरतूद केली नाही. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते.
यावेळेस राज्य सरकारने अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी कुठलीही तरतूद न करून एक प्रकारे विद्यार्थ्यांना "बाबाजी का ठुल्लू" च दिला आहे. पण याच विद्यार्थ्यांनी ठरवले तर ते येत्या निवडणुकीत राज्य सरकारला सुद्धा मत न देता "बाबाजी का ठुल्लू" च देऊन घरी पाठवायला कमी करणार नाहीत हे मात्र नक्की !!
बाकी सर्व सरकारच्याच हातात …
#BabajiKaThullu #maharashtra #Student #Scholarship #AjitPawar #बाबाजी_का_ठुल्लू #Maharashtra_Budget

You May Also Like

0 comments