Social Blog : अन तिने तिला झोडपले…

by - 12:43 AM

आज काल एक फॅशन आली आहे… कुठलाही एक सामाजिक, राजकीय विषय घ्यायचा… त्यावर जनजागृती म्हणून ग्रुपने एकत्र येत रस्त्यात कुठेही उभे राहून डान्स करायचा… त्यासाठी ना कुठली परवानगी… ना कुणाची फिकर… रस्त्यावर फ्लॅश मॉब केल्याने होणारी ट्राफिक जाम मोठ्या शहरात तर नित्याचीच झाली आहे… सामाजिक जनजागृतीच्या नावाखाली सुरु असलेल्या या प्रकाराने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो… गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकाराने होणाऱ्या ट्राफिक जाममुळे होणाऱ्या त्रासाला शहरी जनता आता वैतागू लागली आहे… त्यांच्या या असंतोषाचा भडका एके दिवशी होणे अपेक्षितच होते…
असाच एक प्रकार नुकताच घडला…केरळ राज्यातील पय्यनूर शहरात एक फ्लॅश मॉब सुरु होता… रस्त्यावरून जाणारी वाहने अडवून डान्स करत जनजागृती (?) सुरु होती…बराच वेळ झाला तरी डान्स सुरूच… भर चौकातच डान्स सुरु असल्याने चारही बाजूची ट्राफिक जाम झालेली… अशातच एक महिला या प्रकाराला वैतागलेली… तिच्या गाडीतून खाली उतरली… गेली ती थेट डान्स सुरु असलेल्या ठिकाणी… २५-३० जणांच्या ग्रुपमधील एका तरुणीकडे तिने धाव घेतली… ट्राफिक जाम ला वैतागलेल्या त्या महिलेने डान्स करणाऱ्या त्या तरुणीला धरले… आणि झोडपायला सुरुवात केली… त्यानंतर हा डान्स थांबला…



शेवटी प्रश्न उरतो तो खरच असे प्रकार रस्त्यावर करणे गरजेचे आहे का?… फक्त लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर ट्राफिक जाम करणे कितपत योग्य आहे… कि फक्त प्रसिद्धीसाठीच असे प्रकार केले जातात… मोठ्या शहरात तर अनेकदा अशा फ्लॅश मॉबमुळे झालेल्या ट्राफिक जाम मध्ये रुग्णवाहिका अडकून अनेकांचे प्राण गेल्याच्याही घटना घडल्यात… त्यामुळे प्रत्येकाने अशा प्रकारावर विचार करणे आवश्यक आहे… काही वर्षापूर्वी मोठ्या शहरात होणारे हे प्रकार आता लहान शहरातही फोफावत आहे… यावर वेळीच अंकुश लावणे गरजेचे झाले आहे…
-- ©
‪#‎Flash_Mob‬ ‪#‎Drawbacks‬

You May Also Like

0 comments