Sunday, December 23, 2012

धगधगत्या दिल्लीतील असंतोष .....!!!! The Anna Effect ....
धगधगत्या दिल्लीतील असंतोष   .....!!!!
The Anna Effect ....
दिल्लीत चालत्या बसमध्ये बलात्कार झालेल्या पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी सलग सातव्या दिवशीही तरुणांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. मात्र शांतीपूर्ण चाललेल्या आंदोलनला आज हिंसक वळण मिळालं. पोलिसांनी आज सकाळी संपूर्ण परिसरात जमावबंदी लागू केली पण जमाव येतच राहिला. पोलीस आणि आंदोलकांध्ये आज दिवसभर धुमश्चक्री सुरु आहे.
अन्ना हजारे यांनी मागील वर्षी दिल्ली येथे जनलोकपाल कायद्याच्या मागणी साठी आंदोलन केले होते. त्यात त्यांनी संपूर्ण देशाला आपल्या मागणी आणि हक्कांसाठी पेटून उठण्याची हाक दिली होती. त्याचीच प्रतिक्रिया आठ दिवसांपासून दिल्लीत उमठत आहे.  जनतेवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे लोक आता दिल्ली मध्ये आंदोलन करीत आहेत ते ना कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ना प्रचारक पण फक्त माणुसकीच्या भावनेतून जनतेचा रोष प्रकट करण्यासाठी हे लोक जमले आहेत. आपण जर दोन वर्ष मागे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल कि जनतेवर होणार्या अन्याया संदर्भातील जनतेचा रोष हा फक्त आणि फक्त राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या वेळी दिसून येत होता. परंतु त्यातही राजकारण असल्याने सामान्य जनता कधीही त्यात सहभागी झाली नव्हती. परंतु अन्ना हजारे यांनी दोन वर्षांपासून चालविलेल्या देशव्यापी जन जागरण मोहिमेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या हक्कांसाठी लढण्याची हि ताकद, हि स्फूर्ती फक्त अण्णांच्या आंदोलनामुळे सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे.
कितीही अन्याय झाला तरी नेहमी गप्प असणारा सामान्य माणूस ( आम आदमी ) आज त्याच अन्यायाला त्याच जोराने प्रतिकारही करीत आहे. हीच प्रतिकार करण्याची, पेटून उठण्याची ताकद / धमक अण्णांच्या आंदोलनाने जनतेमध्ये निर्माण झाली आहे. नेहमी अन्यायाच्या वेळेस शांत राहणारा एक मोठा वर्ग यामुळे पेटून उठला आहे.यापुढे सरकार ला सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहावे लागणार आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सरकारला येथून पुढे या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार  आहे. कारण भारतातील जनता आता जागृत झालेली आहे.

 इंडिया गेटजवळ जमलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरासोबतच लाठीचार्ज केला. पण तरीही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. पोलिसांच्या कारवाईनंतर संतप्त झालेल्या आंदोलनकांनी उत्तर म्हणून पोलिसांवर दगडफेक केली. तर काही आंदोलकांनी 26 जानेवारी निमित्त तयार करण्यात आलेल्या बेंचची जाळपोळ केली. इंडिया गेटच्या परिसरात संतप्त आंदोलकांनी एक खासगी कार उलटवून लावली. पोलिसांच्या वाहनाची प्रचंड तोडफोड केली. पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. तर पोलिसांनी प्रसारमाध्यमांवर सुद्धा आसुड उगारला. पत्रकारांवर पाण्याचा मारा करण्यात आला असून पत्रकारांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शांततापूर्ण आंदोलन करावे तोडफोड करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं.


Journalist. Sub-Editor at Daily Pudhari. | also A Web/ blog Designer. At Mitra Publicity.

0 comments:

Post a Comment

Start Work With Me

Contact Us
Kedar Bhope
+91 8055373718
Ahmednagar, Maharashtra, India

Pages

Like us on Facebook