‘तीन पत्ती’ च्या विळख्यात तरुणाई
by
Kedar Bhope
- 11:49 PM
‘तीन पत्ती’ च्या विळख्यात तरुणाई
ऑनलाईन जुगार; जिल्ह्यात रोज हजारों रुपयांची उलाढाल
My News @दैनिकप्रभात अहमदनगर
ऑनलाईन जुगार; जिल्ह्यात रोज हजारों रुपयांची उलाढाल
My News @दैनिकप्रभात अहमदनगर
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात वाढ
by
Kedar Bhope
- 6:37 AM
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात वाढ
विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; शुल्क कमी करण्याची मागणी
#ahmednagar #Daily_Prabhat #AhmednagarNews #Kedar_Bhope
विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; शुल्क कमी करण्याची मागणी
#ahmednagar #Daily_Prabhat #AhmednagarNews #Kedar_Bhope
राज्यातील २३२ खाजगी कायम विनानुदानित शाळांना मिळणार अनुदान
---
My First By name News in Today's Daily Prabhat. Page Number 1..
Ahmednagar & Pune Gramin Edition..
---
My First By name News in Today's Daily Prabhat. Page Number 1..
Ahmednagar & Pune Gramin Edition..
'नो उल्लू बनाविंग' 'नो उल्लू बनाविंग'….
by
Kedar Bhope
- 7:29 AM
'नो उल्लू बनाविंग' 'नो उल्लू बनाविंग'….
जिल्हाधिकारी साहेब आपल्या वेबसाईट वरील माहिती तर जुनीच आहे. म्हणून लोकांना शेंडी नका लावू …
जिल्हाधिकारी साहेब आपल्या वेबसाईट वरील माहिती तर जुनीच आहे. म्हणून लोकांना शेंडी नका लावू …
पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची लुट - १
by
Kedar Bhope
- 1:39 AM
पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची लुट - १
फोटोकॉपी च्या नावाखाली विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची लुट
निवेदन देऊन चर्चा करताना छात्रभारती चे शहर उपाध्यक्ष गजानन भांडवलकर, भरत वाकळे, युगंधर प्रतिष्टान चे अध्यक्ष प्रदीप ढाकणे, युवराज सांगळे आदी
फोटोकॉपी च्या नावाखाली विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची लुट
निवेदन देऊन चर्चा करताना छात्रभारती चे शहर उपाध्यक्ष गजानन भांडवलकर, भरत वाकळे, युगंधर प्रतिष्टान चे अध्यक्ष प्रदीप ढाकणे, युवराज सांगळे आदी
राज्य सरकारच्या प्रलोभनांमुळे शिक्षकांचा परीक्षेवरील बहिष्कार मागे …
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय ;
विद्यार्थ्यांना लाभ
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय ;
विद्यार्थ्यांना लाभ
शिक्षक संघटना दरवर्षी ऐन परीक्षेच्या काळातच परीक्षेवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. या शिक्षकांवर देखरेखीचे काम असलेले शिक्षणाधिकारी मात्र काहीच कारवाई करीत नाहीत. राज्य सरकारच्या बेजाबदार मधल्यामध्ये मात्र विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे.
ढम्म शिक्षणाधिकार्यांविरोधात आता करावेच लागणार आहे …
ढम्म शिक्षणाधिकार्यांविरोधात आता करावेच लागणार आहे …
पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची लुट - १
by
Kedar Bhope
- 5:09 AM
पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची लुट - १
फोटोकॉपी च्या नावाखाली विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची लुट
--------------------------------------------------------------------------------------------------
पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या पदव्युत्तर शाखांच्या विद्यार्थ्यांना आता पेपर रीचेक करण्याआधी विद्यापीठाकडून त्या पेपर ची फोटोकॉपी मागवावी लागणार असून त्यासाठी विद्यापीठाकडून २५० ते ३५० रुपये इतकी शुल्क आकारणी करण्यात येत आहे. पेपर रीचेक ला टाकण्यासाठी आधी पेपरची फोटोकॉपी विद्यापीठाकडून मागविणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले असून त्या संबंधीचा आदेश विद्यापीठाच्या वेब साईट वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी या सत्रापासून सुरु करण्यात आली आहे.
यापूर्वी जर विद्यार्थ्याला पेपर रीचेक करायचा असेल तर निकाल लागल्यानंतर विद्यार्थी शुल्क भरून थेट पेपर रीचेक ला टाकत असत परंतु विद्यापीठाच्या या नव्या निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांना पेपर रीचेक ला टाकायचा असेल तर आधी पेपर ची फोटोकॉपी शुल्क भरून विद्यापीठाकडून मागवावी लागत आहे. हि फोटोकॉपी मागविल्यानंतर १० दिवसांच्या आत परत शुल्क भरून रीचेक साठी अर्ज करावा लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे पैसे आणि वेळ दोन्हींचेही नुकसान होत आहे. या पूर्वीही विद्यार्थ्याला त्याच्या पेपर ची फोटोकॉपी मागविता येत होती परंतु आता रीचेक साठी आधी फोटोकॉपी मागविणे बंधनकारक केले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विद्यापिठाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. महागाईच्या या काळात आधीच विद्यार्थ्यांना शिकणे मुश्किल झाले असल्याने त्यातच विद्यापीठाकडून अशा प्रकारे विद्यार्थ्यांची आर्थिक लुट होत असल्याने विद्यार्थी नाराज आहेत. विद्यापीठाचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे पैसे कमविण्याचा धंदाच झाला असल्याचे या निर्णयावरून लक्षात येत आहे.
आधीच वाढत्या महागाईने देशात सर्व प्रकारचे शिक्षण महाग झाले आहे. डोनेशन च्या नावाखाली शाळांकडून / महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लुट होत आहे. विविध प्रकारच्या शुल्काच्या नावाखाली विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून पैसे घेत आहे. सामान्य विद्यार्थी मात्र त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रकाचे अन्याय सहन करत राहतो. जो कोणी या प्रकारांबद्दल बोलेल त्याला विद्यापीठ महाविद्यालयांकडून त्रास देते त्यामुळे विद्यापीठाच्या विरोधात दाद मागण्यास कुणीही सामान्य विद्यार्थी धजत नाही. आम्ही विद्यार्थी कल्याणच्या योजना राबवितो असा भास निर्माण करून सरकार विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर दिशाभूलच करत आहे.
अहमदनगर महानगरपालिका हद्दीत नायलॉन /चीनी मांज्या वर अखेर बंदी
छात्रभारती च्या लढ्याला अखेर यश
तीन दिवसात माल नष्ट करण्याचे आदेश
आयुक्त आणि महापौरांचे आभार
छात्रभारती च्या लढ्याला अखेर यश
तीन दिवसात माल नष्ट करण्याचे आदेश
आयुक्त आणि महापौरांचे आभार
नायलॉन ( चिनी ) मांज्यावर बंदी आणावी
by
Kedar Bhope
- 4:46 AM
महापौर संग्राम जगताप यांना निवेदन देताना ....
नायलॉन (चिनी) मांज्यावर बंदी संदर्भात लवकरच निर्णय - महापौर संग्राम जगताप यांचे आश्वासन
पुढील महिन्यात साजऱ्या होणार्या मकर संक्रांत सणानिमित्त शहरात विविध ठिकाणी पतंगोत्सव सुरु झाले आहेत. या ठिकाणी पतंग उडविण्यासाठी पूर्वी सध्या धाग्याचा वापर केला जात. परंतु पतंग काटाकाटीच्या या स्पर्धेत सध्या धाग्याऐवजी आता नायलॉन मांज्या चा वापर होत आहे .त्यामुळे या मांज्याच्या खरेदी आणि विक्री / वापरावर बंदी घालण्यासंदर्भात आज छात्रभारती तर्फे महापौर संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे, नितीन लवांडे, गणेश शेळके, अनिल गवते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

AMT बंद प्रवाश्यांसह, विद्यार्थ्यांचे अतोनात हाल,
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष,
स्वयंघोषित नेते मात्र प्रचारात दंग …
#Ahmednagar #AMT #Ahmednagar_AMT_STOP
मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष,
स्वयंघोषित नेते मात्र प्रचारात दंग …
#Ahmednagar #AMT #Ahmednagar_AMT_STOP
पेमराज सारडा महाविद्यालयाचे लाचखोर प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा
by
Kedar Bhope
- 3:31 AM
पेमराज सारडा महाविद्यालयाचे लाचखोर प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा - या मागणीचे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य सहदेव मेढे यांना देतांना छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे आदींसह मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले छात्रभारती चे कार्यकर्ते . मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार .....
by
Kedar Bhope
- 6:57 AM
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार .....
आमदार, खासदार , मंत्र्यांचे या कडे लक्ष जाणार कि नाही ?
परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतेवेळी पुढाकार घेणारे "बोलबच्चन" मंत्री या प्रश्नावर बोलणार का ?
आमदार, खासदार , मंत्र्यांचे या कडे लक्ष जाणार कि नाही ?
परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतेवेळी पुढाकार घेणारे "बोलबच्चन" मंत्री या प्रश्नावर बोलणार का ?
(माझी प्रतिक्रिया - दै दिव्य मराठी )
by
Kedar Bhope
- 5:21 AM
आय टी च्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग ला प्रवेश मिळणार।
विद्यार्थ्यांना दिलासा -
(माझी प्रतिक्रिया - दै दिव्य मराठी )
विद्यार्थ्यांना दिलासा -
(माझी प्रतिक्रिया - दै दिव्य मराठी )
पुणे विद्यापीठ उपकेंद्राला 'टाळे ' ठोकण्याचा छात्रभारती चा इशारा
पुणे विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे . येत्या सोमवार पर्यंत निकाल न लागल्यास पुणे विद्यापीठ उपकेंद्राला 'टाळे ' ठोकण्याचा इशारा छात्रभारती तर्फे आज देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे
पुणे विद्यापीठाने अगदी असेच हाल केले आहेत विद्यार्थ्यांचे
परीक्षा होऊन ३ महिने होत आले तरीही अजून अनेक पदवी परीक्षांचे निकाल नाहीत .
या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध
विद्यार्थ्यांची गळचेपी करण्याच काम विद्यापीठाने करू नये अन्यथा
लवकर निकाल लावू नका फक्त मग कस विद्यापीठ उपकेंद्राला विद्यार्थी टाळे ठोकतील ते पहाच

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे
by
Kedar Bhope
- 5:14 AM
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे
एक हजार एक (१००१) युवकांनी केला नेत्रदानाचा संकल्प
गजानन भांडवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
(नगर) छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अहमदनगर उपशहराध्यक्ष गजानन भांडवलकर यांचा २६ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला यावेळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून छात्रभारती च्या एक हजार एक कार्यकर्त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.
छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे गेल्या वर्षीपासून नेत्रदानावर युवकांमध्ये जनजागृती करून त्यांना नेत्रदानाचे महत्व व त्याविषयी असलेले गैरसमज समजावून सांगून जनजागृती करण्यात येत आहे . याआधीही संघटनेतर्फे नेत्रदानाचा संकल्प करण्यात आलेला आहे . नेत्रदानाचा फक्त संकल्पच न करता लोकांच्या मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी भांडवलकर यांनी सांगितले. नेत्रदानाची हि चळवळ व्यापक प्रमाणात राबविण्याचा विश्वास यावेळी छात्रभारती च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. हे सर्व फोर्म पुणे येथील शासकीय नेत्रपेढीत देण्यात येणार आहेत.
यावेळी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, भरत वाकळे, योगेश गेरंगे, सुहास तोरडमल,दादा दरेकर , वैभव म्हस्के, नंदू भंडारे, रोहित आवारे, विकास झरेकर आदींसह मोठ्या प्रमाणात शहरातील युवक उपस्थित होते.
Follow me on Fb

'बीपी' (बालक पालक)..................
लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय!
आपल्या भारतीय समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जातं. मग इतका संवेदनशील विषय कोणी, कसा आणी कधी शिकवायचा?? साधारण वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून हे असंही काही असतं याची जाणिव व्हायला सुरूवात होते आणि ते नेमकं काय असतं हे जाणून घ्यायच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहचतात. बरं कुतूहुल म्हणून वाटलेल्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मोठ्या माणसांकडे विचारायचीही सोय नसते. अशा वेळी पालकांची मानसिकता आड येते. मग सभोवती असणार्या परिस्थितीतून जसं जसं या विषयातलं ज्ञान पिवळी पुस्तकं, सी ग्रेडच्या फिल्म, ब्लु फिल्मच्या सिडी-डिव्हीडीज अशा चुकीच्या पध्दतीने मुलांना मिळत जातं तसं तसं लैंगिक शिक्षण ह्या विषयाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळंच आणि चुकीचं चित्र निर्माण होऊ लागतं. ज्या वेळी अशा सगळ्या गोष्टी मुलांच्या जीवनात प्रवेश करतात त्या वेळेला त्यांचं बालपण संपलेलं असतं आणि पौगंडावस्थेला सुरूवात झालेली असते.
रवि जाधवचा बालक पालक हा सिनेमा ह्या विषयाचं गांभीर्य आणि त्याबद्दलचा उपदेश अगदी हलक्या फुलक्या आणी सहज-सोप्या पध्दतीने लोकांपर्यंत पोहचवतो. मुलांच्या आणि पालकांच्या मधला दुवा साधण्याचं काम हा चित्रपट योग्य रितीने करतो. चित्रपटातलं कथानक हे ८०-९० च्या दशकात घडत असताना दाखवलंय. कथानक कधीही घडत असलं तरी प्रश्न मात्र तेच राहतात. अव्या, भाग्या, डॉली, चिऊ मध्यमवर्गीय घरातली १३ ते १४ वयोगटातली मुलं.
त्यांच्या आनंदाश्रम चाळीत असणार्या ज्योती ताईने गैरवर्तन केल्यानंतर चाळीत तिच्याबद्दल उलट-सुलट चर्चा होऊ लागतात आणि अशा एका चर्चेतून त्यांच्या कानावर पडतं "तरी मी आधी सांगत होते. आता काय? खाल्लं ना शेण!?" यातल्या खाल्लं ना शेण ह्या शब्दांचा अर्थ त्यांच्या बालमनाला झेपत नाही आणि मग दिवाळीतल्या सुट्टीत ह्या शब्दांचा अर्थ शोधण्याचं ते ठरवतात. बराच प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना त्या शब्दांचा अर्थ मिळत नाही तेव्हा ते भाव्याचा मित्र 'विशू'ची मदत घ्यायचं ठरवतात. विशू हा त्यांच्याच वयाचा झोपडपट्टीत वावरणारा मुलगा. पण भौतिक परिस्थितून त्याला हे सगळं खुप लवकरच कळायला लागलेलं असतं. मग तो त्याच्या पध्दतीने जमेलं तसं हे ज्ञान त्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो.
ढिचँक-ढिचॅक! विशू त्याच्या पध्दतीने ह्या मुलांना समजेल असं ह्या विषयाला नाव देतो आणि अगदी सोप्या भाषेत त्यांना समजवायचा प्रयत्न करतो. मग पहिल्यांदा पिवळ्या पुस्तकांच चुकीचं माध्यम निवडून विशू त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तो प्रयत्न करतो. ढिचाँक-ढिचाक हे प्रत्येकाच्या मनात लपलेलं असतं जो त्याला बाहेर न काढता फक्त मनातच दडवून ठेवतो तो सभ्य आणि जो ते बाहेर काढतो तो असभ्य. विशूचं लैंगिक शिक्षणाबद्दलचं अतिशय अचुक पण मार्मिक मत. पिवळ्या पुस्तकांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे भाड्याने व्हिसीआर आणून तसले 'स्पेशल' सिनेमे पाहण्यापर्यंत जातो. ह्या सगळ्यातून त्यां मुलांमध्ये वैचारीक आणि मानसिक बदल होत जातात. आणि मग वयाने मोठ्या असणार्या चाळीतल्या मुलीला आय लव्ह यु बोलण्यापासून ते नेहमी सोबत वावरणार्या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी करण्यापर्यंत त्या मुलांची मजल जाते. ब्लु फिल्म पाहिल्यानंतर भाग्याला चाळीतल्याच पण त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या नेहा ताईंबद्दल आकर्षण निर्माण होतं तर अव्याला चिऊबद्दल प्रेमाची भावना जागृत होऊ लागते.
चाळीतल्या कदम काकांना या गोष्टी माहीत पडल्यानंतर ते या मुलांच्या पालकांना जागं करण्याचा प्रयत्न करतात पण आधीच सभ्यतेची झापडं आपल्या डोळ्यांवर लावलेल्या त्या पालकांना ह्या गोष्टीतलं गांभीर्य पटकन कळत नाही. मुलांमध्ये हे ज्ञान देण्यासाठी पालकांकडूनच विरोध होतोय हे पाहिल्यानंतर कदम काका स्वतः मुलांना लैंगिक शिक्षणाविषयी समजावून सांगतात.
चित्रपटातल्या मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती विशू ह्या मुलाच्या माध्यमातून होते. पण आता सद्यस्थितीत विशूच्या जागी अनेक पोर्नोग्राफिक संस्थळ, मॅग्झीन्स, रस्त्यावर सहजरीत्या उपलब्ध होणार्या ब्लु फिल्मच्या सिडीज हे काम करताना दिसतात. पाश्चात्य देशात लैंगिक शिक्षण हे महत्वाचं मानलं जात असून ते आता शालेय उपक्रमातही सामाविष्ट केलं गेलंय पण त्याचबरोबर भारतासारख्या विकसनशील देशात हा विषय जाहिररीत्या बोलण्यात अजूनही लोकांना दडपण येतं.
असो.
'सेक्स एज्युकेशन' सारख्या धाडसी विषयाला हात घातल्याबद्दल रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर या दोन्ही निर्मात्यांचं कौतूक करावंस वाटतं.
नटरगं आणि बालगंधर्वनंतर रवी जाधव माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत आला होता त्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा पाहायला जाणं खुप आधीपासूनच ठरवलं. इतका नाजुक विषय पण त्याने त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून बरोबर हाताळलाय कि ज्यामुळे चित्रपट कुठेही भडक वाटत नाही.
चित्रपटाची कथा अंबर हडप आणि गणेश पंडीत यांनी प्रभावीपणे लिहलीय. मुलांच प्रबोधन करण्यासाठी कदम काका हे कॅरेक्टर नेमकं निवडलंय. विशाल शेखर यांनी दिलेलं चित्रपटाचं संगीत कानांना ऐकायला बरं वाटतं. विशाल दादलानीने गायलेलं करूया आता कल्ला कल्ला कल्ला हे एकदम गाणं एकदम रॉक झालंय. त्यातल्या त्यात शेखरचा आवाज असलेलं 'हरवली पाखरे' हे गाणं मला खुपच आवडलं. चुकीच्या लैंगिक शिक्षणामुळे मुलांच्या भावविश्वात झालेले बदल आणी त्यांच हरवत चाललेलं बालपण हे गाणं नेमक्या शब्दात व्यक्त करतं. चाळीतले कदम काका मुलांना 'सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो' शिकवत असतात आणि नेमक्या त्याच वेळेला हि चारही मुलं विशूच्या साह्हायाने ब्लु फिल्म पाहण्यासाठी भाड्याने व्हिसीआर घेऊन येतात. आणि बॅकग्राऊंडला गाणं वाजत असतं...
सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
सिच्युऐशनला अनुसरून असणारं गाणं..एकदम चपखल! गुरू ठाकूर आणि रवि जाधव यांनी लिहलेल्या गीतांचे शब्द लक्षात राहतील असे आहेत.
महेश लिमयेच्या सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाला ऐक वेगळा आणि फ्रेश लुक येतो. दिवाळीतली दृश्य, नदीवरची सगळी दृश्य अतिशय सुंदर आहेत. चित्रपटात दाखवलेली आनंदाश्रम नावाची चाळ बहुदा आमच्या ठाण्यातल्या बी-केबीन इथली असावी.
चित्रपटात अविनाश खर्शीकर, आनंद अभ्यंकर, माधवी जुवेकर, सुप्रिया पाठारे, सई ताम्हणकर, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, सतिश तारे या सगळ्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे अभिनय केलाय. किशोर कदम यांनी सगळ्यांची काळजी घेणारा आणि मुलांवर बारीक लक्ष ठेवणारा कदम काका उत्तम साकारलाय. थोड्या काळासाठी अमृता सुभाष आणि सुबोध भावे हे दोघंही चमकून जातात. पण या चित्रपटाची सर्वात महत्वाची आणि मुख्य बाजु म्हणजे यातल्या सर्व बाल कलाकारांनी केलेला अभिनय. प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, भाग्यश्री सकपाळ, रोहित फाळके या पाचही मुलांनी अप्रतिम अभिनय केलाय. विशेषतः प्रथमेश परबने साकारलेला विशू. ह्या मुलाने विशूच्या भुमिकेत धम्माल अभिनय केलाय.
छान सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट पालकांनी आपल्या मुलांसोबत बसून आवर्जून पाहायला हवा. मला व्यक्तिशः खुप आवडला. चित्रपटाच्या सुरूवातीलाच फ्रँकलीन रोझवेल्टचं एक समर्पक वाक्य आहे.
'we may not be able to prepare the future for our children, but we can at least prepare our children for the future.'
****