एक हजार एक (१००१) युवकांनी केला नेत्रदानाचा संकल्प

12:25 AM

एक हजार एक (१००१) युवकांनी केला नेत्रदानाचा संकल्प 
गजानन भांडवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 
(नगर) छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अहमदनगर उपशहराध्यक्ष गजानन भांडवलकर यांचा २६ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला यावेळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून छात्रभारती च्या एक हजार एक कार्यकर्त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे गेल्या वर्षीपासून नेत्रदानावर युवकांमध्ये जनजागृती करून त्यांना नेत्रदानाचे महत्व व त्याविषयी असलेले गैरसमज समजावून सांगून जनजागृती करण्यात येत आहे . याआधीही संघटनेतर्फे नेत्रदानाचा संकल्प करण्यात आलेला आहे . नेत्रदानाचा फक्त संकल्पच न करता लोकांच्या मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी भांडवलकर यांनी सांगितले. नेत्रदानाची हि चळवळ व्यापक प्रमाणात राबविण्याचा विश्वास यावेळी छात्रभारती च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. हे सर्व फोर्म पुणे येथील शासकीय नेत्रपेढीत देण्यात येणार आहेत. 
यावेळी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, भरत वाकळे, योगेश गेरंगे, सुहास तोरडमल,दादा दरेकर , वैभव म्हस्के, नंदू भंडारे, रोहित आवारे, विकास झरेकर आदींसह मोठ्या प्रमाणात शहरातील युवक उपस्थित होते. 


Follow me on Fb

You Might Also Like

0 comments

Like us on Facebook