डोनेशनच्या नावाखाली लूट

by - 5:03 AMबालशिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही शाळेला देणगी (डोनेशन) स्वीकारता येत नाही. तथापि, शहरातील नामांकित शाळांना या नियमाचा विसर पडला असून डोनेशनच्या नावाखाली सध्या लूट सुरू आहे. शिक्षण विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, या अट्टहासापोटी पालकही संस्थांच्या लुटीला बळी पडत आहेत. या सर्व प्रकरणाला शिक्षणाधिकारी साहेब अहमदनगर यांचा छुपा पाठींबा असल्याची शक्यता वाटत आहे . तरी त्यांच्याकडून लवकरात लवकर काही कारवाई न झाल्यास त्यांच्या दालनात छात्रभारती च्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे

You May Also Like

0 comments