नायलॉन ( चिनी ) मांज्यावर बंदी आणावी

by - 4:46 AM

महापौर संग्राम जगताप यांना निवेदन देताना ....
नायलॉन (चिनी) मांज्यावर बंदी संदर्भात लवकरच निर्णय - महापौर संग्राम जगताप यांचे आश्वासन

पुढील महिन्यात साजऱ्या होणार्या मकर संक्रांत सणानिमित्त शहरात विविध ठिकाणी पतंगोत्सव सुरु झाले आहेत. या ठिकाणी पतंग उडविण्यासाठी पूर्वी सध्या धाग्याचा वापर केला जात. परंतु पतंग काटाकाटीच्या या स्पर्धेत सध्या धाग्याऐवजी आता नायलॉन मांज्या चा वापर होत आहे .त्यामुळे या मांज्याच्या खरेदी आणि विक्री / वापरावर बंदी घालण्यासंदर्भात आज छात्रभारती तर्फे महापौर संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे, नितीन लवांडे, गणेश शेळके, अनिल गवते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


You May Also Like

0 comments