Sport Blog : क्रिकेटमधील विजय आणि देशातील असंतोष
न भूतों न भविष्यती... असा जल्लोष आज देशात चाललायं...
भारताने याआधीही पाकिस्तानला क्रिकेटमध्ये धूळ चारलेली आहे... पण आजचा विजय, अन् त्यानंतरचा देशभरातील जल्लोष हा काही खास आहे...
आधी जेएनयु प्रकरण अन् त्यानंतरचं ओवेसी च भारत माता की जय ला केलेला विरोध... याविरुद्ध देशातील जनतेत खदखदत असलेला असंतोष आजच्या जल्लोषातून बाहेर पडतोय... जेएनयु त देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या हे खर.. कुणी दिल्या? का दिल्या? हे तपासात समजेलच...
त्या ओवेसीने घटनेत उल्लेख नाही म्हणत भारत माता की जय म्हणायला नकार दिला, हेही खरच...
या दोन्ही घटनातील साम्य म्हणाल तर दोन्ही घटना या राजकारणासाठीच घडल्या किंवा घडवल्या गेल्या...
भारतीय जनता, जी एरवी राजकारणात पडत नाही... अन् पडलीच तर मतपेटीतून आपला विरोध, पाठिंबा दाखवते... ती जनता मात्र जेएनयु असो वा ओवेसी दोन्ही प्रकरणात शांत दिसुन येत होती मात्र जनतेच्या मनात अंतर्गत खदखद होती, असंतोष होता... आपल्याच देशात राहुन पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषना जनतेने सहन केल्या... मात्र आजच्या सामन्यानंतर जनतेने दिलेल्या उस्फुर्त घोषना या त्यांच्याविरोधात होत्या ज्यांनी राजकारणासाठी देशाच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उभे केले, ज्यांनी राजकारणासाठी देशाचा जयजयकार करायला नकार देत तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला... जनतेचा असंतोष हा बर झालं, सामन्यातील विजयातून बाहेर पडतोय... हाच असंतोष हिंसक मार्गाने बाहेर पडल्यास त्या राजकारण्यांचे मुडदे पाडायलाही सक्षम आहे हे कुणी विसरता कामा नये...
असो, टीम इंडिया ला विजयाच्या शुभेच्छा ...
जय हिंद ...
0 comments