Social Blog : कालबाह्य कायदे बदलण्याची गरज…

by - 1:09 AM

शनि चौथ-यावरील महिलांच्या प्रवेशावरुन सुरु झालेला वाद व्यापक स्वरुप घेत आहे...
निवडक महिला कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असून शिंगणापूर नंतर हे लोण आता त्रिंबकेश्वर, कोल्हापूरची देवी, कार्तिक स्वामी मंदिर आदी ठिकाणी पसरत चाललं आहे... अनेक ठिकाणी भेदभावाला, परंपरांना विरोध करणा-या महिला या एकच आहेत... तर समर्थन करणा-या महिलांच प्रमाण हे त्या तुलनेत जास्त असल्याने या बाबतीत असलेल्या कायद्यांचा फेरविचार होणे गरजेचे झाले आहे... त्या कायद्यात बदल करुन स्त्री - पुरुष भेदभाव न होता मध्यम मार्ग काढण्याची गरज आहे... अनेक कायदे हे आजच्या काळात तकलादू, बुद्धिभेद निर्माण करणारे, पळवाटा असणारे झाले असून त्यांना आता कालबाह्य ठरवण्याची गरज आहे.. © kedarbhope


You May Also Like

0 comments