­
अधिकार कपातीवरून सदस्य आक्रमक! - Kedar Bhope

अधिकार कपातीवरून सदस्य आक्रमक!

by - 10:53 PM

अधिकार कपातीवरून सदस्य आक्रमक!
#अहमदनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेकडील रस्ते कामांच्या अधिकारात कपात करून ते अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांसह, सदस्यांचे ‘पंख छाटणार्‍या’ या निर्णयाच्या विरोधात घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. शासन निर्णय येण्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचे टेंडर काढण्याची मागणी करत सदस्यांनी व्यासपीठासमोरच धरणे आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. काही सदस्यांनी शासन निर्णयाचे तुकडे करून सभागृहात भिरकावले.
My news Daily #Pudhari ...21-10-2018
#Ahmednagar
#nagarzp
#NEWS

You May Also Like

0 comments