चांद्यात विद्यार्थ्यांचा वर्ग भरतोय पाण्यात

by - 2:03 AM

चांद्यात विद्यार्थ्यांचा वर्ग भरतोय पाण्यात 

नगर । नेवासे तालुक्यातील चांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नवीन इमारत वर्षाच्या आतच गळायला लागली आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर बुधवारी जि. प. अधिकार्‍यांनी शाळेची पाहणी केली. शाळा लवकर दुरुस्त झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी या शाळेच्या काही खोल्यांचे बांधकाम झाले आहे. बांधकाम निकृष्ट झाल्याने पहिल्या पावसातच मुख्याध्यापकांच्या कार्यालयासह काही खोल्या गळायला लागल्या. भिंतीमध्येही पावसाचे पाणी झिरपत आहे. विद्यार्थ्यांचे त्यामुळे हाल होत आहेत. पावसाचे पाणी वर्गात साचल्यामुळे विद्यार्थ्यांना खाली बसता येत नाही. त्यामुळे दोन वर्ग एकत्र बसवण्याची वेळ आली. You May Also Like

0 comments