पुणेविद्यापीठाच्या तालिबानी प्रवृत्तीच्या परिपत्रकाचा छात्रभारती तर्फेजाहीर निषेध

by - 11:51 PM

पुणेविद्यापीठाच्या तालिबानी प्रवृत्तीच्या परिपत्रकाचा छात्रभारती तर्फेजाहीर निषेध

नुकत्याच पुणेविद्यापीठानेत्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांसाठी जाहीर केलेल्या परिपत्रकामध्येविद्यार्थ्यांची

मुस्कटदाबी करण्याचेकाम केलेआहे . या परिपत्रकानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला जर त्याच्या महाविद्यालय अथवा कॉलेज विषयी

काही तक्रार असेल आणि त्या विद्यार्थ्यानेजर त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वृत्तपत्रेअथवा टी व्ही

यांसारख्या प्रसिद्धीमाध्यमांचा वापर केला असेल तर त्या विद्यार्थ्याला महाविद्यालय रु५००० (पाच हजार ) पर्यंत दंड करूशकते

आणि त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्याचा महाविद्यालयाला अधिकार असेल असा तालिबानी फतवा काढला आहे. अशा प्रकारे

तालिबानी फतवा काढून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करणाऱ्या विद्यापीठाच्या या प्रवृत्तीचा छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे

जाहीर निषेध करण्यात येत आहे.

भारतीय घटनेनुसार प्रत्येक भारतीयाला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार

प्रत्येक भारतीयाला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलण्याचा, लिहण्याचा,आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याचा अधिकार

दिलेला आहे. पुणेविद्यापीठाचा हा फतवा म्हणजेएक प्रकारेभारतीय राज्य घटनेचीच पायमल्ली करण्याचा प्रकार आहे. हा अधिकार

पुणेविद्यापीठ च काय तर अन्य कोणीही विद्यार्थ्यांकडून हिरावून घेऊ शकत नाही. हा प्रकार म्हणजेपुणेविद्यापीठ आणि विविध

शैक्षणिक संस्था चालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून झालेली मुस्कटदाबी होय . पुणेविद्यापीठानेअसा फतवा काढण्याआधी बोगस पी

एच डी धारक प्राध्यापक आणि नेट सेट पात्रतेसाठी आंदोलन करून विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या प्राध्यापकांविषयी काय कारवाई

केली हेजाहीर करावेआणि मग च विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा फतवा काढावा. विद्यापीठाने काहीही करावे आणि विद्यार्थ्यांनी

याविषयी काहीही एक बोलायचे नाही असा या फतव्यामागील हेतू असावा अशी शंका आता उपस्थित होत आहे.

तरी विद्यापीठानेहेपरिपत्रक त्वरित रद्द करावेअन्यथा विद्यापीठाविरोधात आंदोलनाबरोबरच कायदेशीर लढाई लढण्यासही

विद्यार्थी मागेपुढेपाहणार नाहीत याची पुणेविद्यापीठानेदखल घ्यावी.
You May Also Like

0 comments