Travel Blog : श्री. कनकालेश्वर मंदिर
दीड वर्षांपूर्वी बीडच्या श्री. कनकालेश्वर मंदिरात गेलो होतो.. त्यानंतर पुन्हा लवकर योग येईल असं वाटलं नव्हतं.. आज सकाळी अचानकच जाण्याचा योग आला...
पुरातन भारतीय वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे.. मंदिरात जातांना पाण्यातून असलेले दगडी पुलावरून जावे लागते... उन्हाळ्यातही येतील पाणी पूर्णतः आटत नाही... एकदा भेट दिल्यावरही पुन्हा या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ओढ लागते... मला वारंवार भेट द्यावी वाटणाऱ्या ठिकानांमध्ये या मंदिराचा समावेश आहे...
मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी भगवान महादेवाची पिंड आहे... आत जातानाच मोठा नंदी आहे...
गाभाऱ्यात जातांना उजव्या बाजूला प्रभू श्रीराम , सीता आणि लक्ष्मणाच्या तीन मनमोहक आशा मुर्त्या दिसून येतात... डाव्या बाजूला संकटमोचक हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते...
मंदिराच्या समोरच श्री. कालभैरवाचे दुसरे मंदिर आहे.. त्याच्या बाजूलाच हार, फुलं विकणारे काही विक्रेते बसतात.. शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाखाली मोटारसायकल पार्किंग करण्यासाठी जागा आहे.. विविध धार्मिक विधी करण्यासाठी दूरवरून भाविक येतात..
बीड शहरातच हे मंदिर आहे.. दिवसभरात शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.. पर्यटनाच्या दृष्टीने मंदिराच्या विकासासाठी खूप काही करण्याजोगे आहे.. मंदिराच्या चारही बाजूने तारेचे कुंपण केलेले असले तरी, वेड्या बाभळीची झाडे, गवत वाढलेले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात थोडा कमीपणा येतो.. मंदिराच्या चहुबाजूंनी असलेल्या पाण्यात धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून थोडा कचरा टाकण्यात येत असल्याने स्वच्छता राखण्याची गरज आहे... अस्वच्छतेचा प्रश्न सोडल्यास बाकी मंदिर मात्र एकदा बीडवरून जाता जाता भेट देण्याजोगे असेच आहे..
0 comments