Travel Blog : श्री. कनकालेश्वर मंदिर
by
Kedar Bhope
- 3:08 AM
दीड वर्षांपूर्वी बीडच्या श्री. कनकालेश्वर मंदिरात गेलो होतो.. त्यानंतर पुन्हा लवकर योग येईल असं वाटलं नव्हतं.. आज सकाळी अचानकच जाण्याचा योग आला...
पुरातन भारतीय वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे.. मंदिरात जातांना पाण्यातून असलेले दगडी पुलावरून जावे लागते... उन्हाळ्यातही येतील पाणी पूर्णतः आटत नाही... एकदा भेट दिल्यावरही पुन्हा या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ओढ लागते... मला वारंवार भेट द्यावी वाटणाऱ्या ठिकानांमध्ये या मंदिराचा समावेश आहे...
मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी भगवान महादेवाची पिंड आहे... आत जातानाच मोठा नंदी आहे...
गाभाऱ्यात जातांना उजव्या बाजूला प्रभू श्रीराम , सीता आणि लक्ष्मणाच्या तीन मनमोहक आशा मुर्त्या दिसून येतात... डाव्या बाजूला संकटमोचक हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते...
मंदिराच्या समोरच श्री. कालभैरवाचे दुसरे मंदिर आहे.. त्याच्या बाजूलाच हार, फुलं विकणारे काही विक्रेते बसतात.. शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाखाली मोटारसायकल पार्किंग करण्यासाठी जागा आहे.. विविध धार्मिक विधी करण्यासाठी दूरवरून भाविक येतात..
बीड शहरातच हे मंदिर आहे.. दिवसभरात शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.. पर्यटनाच्या दृष्टीने मंदिराच्या विकासासाठी खूप काही करण्याजोगे आहे.. मंदिराच्या चारही बाजूने तारेचे कुंपण केलेले असले तरी, वेड्या बाभळीची झाडे, गवत वाढलेले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात थोडा कमीपणा येतो.. मंदिराच्या चहुबाजूंनी असलेल्या पाण्यात धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून थोडा कचरा टाकण्यात येत असल्याने स्वच्छता राखण्याची गरज आहे... अस्वच्छतेचा प्रश्न सोडल्यास बाकी मंदिर मात्र एकदा बीडवरून जाता जाता भेट देण्याजोगे असेच आहे..
Administrative Blog : टीकेचे धनी... !
by
Kedar Bhope
- 9:28 PM
केदार भोपे
तुम्हाला वाल्याचा वाल्मिकी कसा झाला? याची कथा माहित असेलच. वाल्या दरोडेखोर होता. लूटमार करून आलेल्या पैशांवर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. नारदमुनींनी त्याला तुझ्या या पापातील वाटेवर कोण? असा सवाल विचारल्यावर त्याने घरच्यांना पापातील वाटेकरी होणार का? असे विचारले. मात्र घरच्यांनी त्याचा पापात वाटेकरी होण्यास नकार दिल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, सुख, यश हे सर्वांना हवे असते मात्र दुःख व अपयश हे सर्वांना नकोसे असते. एखादे चांगले काम झाले तर प्रशंसेस आम्ही पात्र पण तेच काम बिघडल्यास मात्र आम्ही जबाबदार नाही, असा आजकालचा पायंडाच पडलाय. मिनी मंत्रालयातही अनेकांना असाच अनुभव येतोय. चांगल्या कामाचे श्रेय घेण्यास सगळेच सरसावतात. मात्र टीकेचे धनी व्हायला कोणी तयार नाही. अशाच प्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी होताहेत. सर्वसाधारण सभा आली की सीईओंना टार्गेट करण्यात येतंय हे खरे असले तरी असं होतंय तरी कसं? आणि का? याचाही उहापोह होणे गरजेचे वाटते. ऑगस्ट २०१७ मध्ये विश्वजित माने यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याआधी पाच महिन्यापूर्वीच मिनी मंत्रालयात खांदेपालट झालेला. २०१७ सालचे बजेटही तत्कालीन सीईओंनी मांडलेले. पदाधिकारी नवीन, अनेक अधिकारीही नवीन त्यामुळे २०१७-१८ मध्ये मिनी मंत्रालयाच्या योजना राबवितांना अधिकाऱ्यांना आणि राबवून घेतांना पदाधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सदस्य, पदाधिकारी नवीन असल्याने समजता समजताच एक वर्ष गेले. पदाधिकाऱ्यांच्या नवखेपणाचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी कामात ढिलाई केल्याचेही आरोप सदस्य, पदाधिकाऱ्यांमधून होत असतात. कामात जितकी चपळाई प्रशासनाने दाखवायला हवी तितकी दिसून येत नाही हेही वास्तवच. यातूनच पदाधिकारी, सदस्यांच्या टीकेच्या भडिमाराला सुरुवात झाली. सुरुवातीला काही सर्वसाधारण सभांमध्ये विभागप्रमुखांवर तुटून पडणारे सदस्य, पदाधिकारी यांचा टीकेचा सूर कधी सीईओंवर गेला ते कळलेच नाही. गेल्या वर्षभरापासून मानेंवर आरोप होताहेत. कामात पक्षपातीपणा करणे, कामांच्या फाईल्स अडवून ठेवणे, कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अंकुश नसणे, पदाधिकाऱ्यांना न जुमानने, योजना प्रलंबित ठेवणे असे एक ना अनेक गंभीर आरोप सदस्य, पदाधिकारी करताहेत. याची खरी सुरुवात केली ती खुद्द अध्यक्षा शालिनी विखेंनी. नागरिकांची कुठलीही कामे होत नाहीत, कामासाठी अधिकारी भेटत नाहीत, असे म्हणत सीईओंचे मिनी मंत्रालयावरील नियंत्रण सुटल्याचा घाणाघातच त्यांनी केला होता. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनीही सीईओ मानेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य कराळे यांनीही सीईओ मानेंच्या विरोधात विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली. विशेष सभा कशाला तर अविश्वास ठराव घेण्यास. त्यानंतर आता चार दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा मानेंना टार्गेट करण्यात आले. शाळा खोल्यांचे निर्लेखन, पूर्वीच्या लोकल बोर्डाच्या मालकीच्या जागा मिनी मंत्रालयाच्या नावावर करण्यासाठीचा सर्वे, सदस्यांनी मागितलेली माहिती अधिकारी देत नाहीत, सरकारी जागेवर झालेली अतिक्रमणे, पंचायत राज समितीने घेतलेले आक्षेप ही कारणे त्यासाठी पुरेशी होती. पदाधिकारी, सदस्य अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असतांना मुळात ही वेळ आलीच कशामुळे हे ही पाहणे महत्वाचे ठरते. महसूल खात्यातून आल्याने सीईओ मानेंवर त्या खात्याचा पगडा असणे स्वाभाविकच. त्यांच्या कामाची पद्धतही काहीशी तशीच. प्रत्येक फाईल बारकाईने पाहण्याची त्यांची सवय. दुर्घटनासे देर भली या उक्तीप्रमाणे त्यांचे काम. मिनी मंत्रालयात मात्र थोडं उलटं. दुर्घटना झाली तरी चालेल पण देर नको, असा सगळ्यांचा रेटा. त्यामुळेच सीईओ माने आणि सदस्य, पदाधिकाऱ्यांचे काही केल्या जमेना. मानेंच्या काळात अनेक प्रकार घडले. त्यात निंबोडी दुर्घटना, पोषण आहार, हायमास्ट घोटाळ्याचे आरोप, पीआरसी कमिटीने घेतलेले आक्षेप, कामातील अनियमितता नेहमीच पुढे आल्यात. मात्र त्यात कारवाई काडीचीही झालेली नाही हेही वास्तवच. अखर्चित निधीचे तर विचारूच नका. कोट्यवधींचा निधी दरवर्षी माघारी जातोय. तो अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच. सदस्य, पदाधिकारी निधीसाठी भांडणं करत असतांना अखर्चित निधीचे अधिकाऱ्यांना काहीच कसे वाटत नाही? हा खरा सवाल. सीईओ म्हणजे सर्व विभागांचे प्रमुख. सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावेच लागणार ना? सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या आरोपानंतर हतबल सीईओ मानेंनी कठोर भूमिका घेण्याचा पवित्रा घेतला. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना १ ते ४ नुसार कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पण अशी कारवाई करणार तरी किती अधिकाऱ्यांवर? सगळ्याच अधिकाऱ्यांवर अशी कारवाई करायची म्हटली तर प्रशासकीय अनागोंदी ही अटळच, हे सदस्य गडाख यांचे म्हणणेही बरोबरच. त्यामुळे सीईओ मानेंनी खमकी भूमिका घेणे आवश्यक वाटते. सदस्य, पदाधिकाऱ्यांना त्यांच्या टर्मचे दोन वर्षे पूर्ण होत आलेत. अजून तीन वर्षे त्यांच्या हातात असली तरी, कामे न झाल्यास असले आरोप हे होतच राहणार. सीईओंच्या बोटचेप्या भूमिकेमुळे त्यांच्यावर अविश्वास ठरावाचे वावटळ घोंगावत आहे. किमान त्यापासून बचावासाठी तरी त्यांना कामात प्रशासकीय सुसूत्रता आणावी लागेल. पूर्वाश्रमीचे सीईओ शैलेश नवाल यांच्या कारकिर्दीत असलेल्या प्रशासकीय सुसूत्रतेचे नाव आजही अनेक आजी-माजी सदस्य घेत असतात. भूतकाळात थोडे डोकावून त्या वेळी काम नेमके कसे चालत होते? याचाही आढावा घेणे आवश्यक वाटते. सदस्यांकडून सीईओ मानेंवर होत असलेल्या पक्षपातीपणाच्या आरोपाकडेही गांभीर्याने पाहावे लागेल. सत्ता ही येते- जाते. नेतेही तेच असतात फक्त त्यांचा पक्ष बदलतो. विरोधी पक्षातले सत्तेत येतात तर, सत्तेतले विरोधी पक्षात येतात. त्यामुळे कुणा एकाला झुकते माप, आणि दुसऱ्याला वाटाण्याच्या अक्षदा असे व्हायला नको. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया, असे म्हटले जाते. मात्र निरंतर म्हणजे किती? हेही निश्चित करावे लागेल. मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून विकासाचे रहाटगाडगे ओढण्याचे काम करत असतांना यापुढे त्यांना टीकेचे धनी होण्याचे भाग्य न लाभो हीच अपेक्षा.
(Previously published in Daily Pudhari)
ग्रामपंचायतींचे व्हिलेजबुक अंतिम टप्प्यात!
by
Kedar Bhope
- 7:21 PM
जिल्ह्यात एक हजार पदांची मेगा भरती ...
by
Kedar Bhope
- 4:30 PM
नोकरीच्या संधीच्या शोधात असलेल्यांना खुशखबर...!
जिल्ह्यात एक हजार पदांची मेगा भरती ...
My special news Daily Pudhari...14-12-2018
#Ahmednagar #Recruitment #Jobs #Maharashtra
जिल्ह्यात एक हजार पदांची मेगा भरती ...
My special news Daily Pudhari...14-12-2018
#Ahmednagar #Recruitment #Jobs #Maharashtra
ऐन दुष्काळात झेडपी सदस्यांची 'विमानवारी'!
by
Kedar Bhope
- 7:32 PM
अधिकार कपातीवरून सदस्य आक्रमक!
by
Kedar Bhope
- 10:53 PM
अधिकार कपातीवरून सदस्य आक्रमक!
#अहमदनगर : प्रतिनिधी
#अहमदनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेकडील रस्ते कामांच्या अधिकारात कपात करून ते अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पदाधिकार्यांसह, सदस्यांचे ‘पंख छाटणार्या’ या निर्णयाच्या विरोधात घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. शासन निर्णय येण्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचे टेंडर काढण्याची मागणी करत सदस्यांनी व्यासपीठासमोरच धरणे आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. काही सदस्यांनी शासन निर्णयाचे तुकडे करून सभागृहात भिरकावले.
My news Daily #Pudhari ...21-10-2018
#Ahmednagar
#nagarzp
#NEWS
My news Daily #Pudhari ...21-10-2018
#Ahmednagar
#nagarzp
#NEWS
शिक्षक पुरस्कारावरून होणार वाद?
by
Kedar Bhope
- 7:20 PM
शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार्या जिल्हा शिक्षक पुरस्कारावरून यंदा वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिक्षक निवडतांना आजी-माजी सदस्यांमध्ये चढाओढ लागली असून, ‘झंजट नको’ म्हणून जिल्हा परिषदेने निवडीचे अधिकार विभागीय आयुक्तांना देत आपली बाजू ‘सेफ’ केली आहे.
My news Daily Pudhari 03-09-2018
#Ahmednagar #News #nagarzp
My news Daily Pudhari 03-09-2018
#Ahmednagar #News #nagarzp
गटबाजीची 'बुलेट ट्रेन' सुसाट...
by
Kedar Bhope
- 8:19 PM
गटबाजीची 'बुलेट ट्रेन' सुसाट...
जिल्हा परिषदेतील पक्षांतर्गत गटबाजीचा हा घेतलेला आढावा...
My special article Daily Pudhari...27-08-2018
#Ahmednagar #nagarzp #congress #BJP#NCP #Shivsena
जिल्हा परिषदेतील पक्षांतर्गत गटबाजीचा हा घेतलेला आढावा...
My special article Daily Pudhari...27-08-2018
#Ahmednagar #nagarzp #congress #BJP#NCP #Shivsena
जिल्ह्यात भाजपला हादरा देणार : राजेंद्र फाळके
by
Kedar Bhope
- 8:59 PM
देशात मध्यंतरी आलेल्या ‘लाटेत’ पक्षातील काही नेते ‘इकडचे- तिकडे’ गेले. पण लाटेचा ‘प्रभाव’ आता ओसरत आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विरोधी पक्ष व भाजपला राष्ट्रवादीच्या माध्यमातून ‘हादरा’ देणार असल्याचा सूचक इशारा राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला.
My news Daily Pudhari... 25-08-2018
#Ahmednagar #NCP
My news Daily Pudhari... 25-08-2018
#Ahmednagar #NCP
हायमास्ट घोटाळा पंकजांच्या दारी
by
Kedar Bhope
- 10:50 PM
हायमास्ट घोटाळा पंकजांच्या दारी..
जिल्हा परिषदेतील हायमास्ट (पथदिवे) दिव्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून, चौकशी करण्याबाबत चालढकल करणार्या जिल्हा परिषद प्रशासनाकडून आता तरी चौकशी सुरु होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
My news Daily Pudhari...11-08-2018
#Ahmednagar #nagarzp

आम्ही सारे (च) खवय्ये...?
by
Kedar Bhope
- 11:26 AM
आम्ही सारे (च) खवय्ये...?
जिल्हा परिषदेतील हायमास्ट घोटाळा प्रकरणातील अधिकारी- पदाधिकाऱ्यांच्या युतीवर प्रकाश टाकणारा माझा लेख...
My Special Article Daily Pudhari...06-08-2018
#Ahmednagar #nagarzp
जिल्हा परिषदेतील हायमास्ट घोटाळा प्रकरणातील अधिकारी- पदाधिकाऱ्यांच्या युतीवर प्रकाश टाकणारा माझा लेख...
My Special Article Daily Pudhari...06-08-2018
#Ahmednagar #nagarzp
अनुकंपा भरतीची चौकशी रखडली
by
Kedar Bhope
- 11:02 PM
अनुकंपा भरतीची चौकशी रखडली
2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीच्या संदर्भात तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी अध्यक्षा शालिनी विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्याकडे दिला होता. अहवालातील त्रुटी पाहिल्यानंतर हा अहवाल पुढील कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. अहवाल पाठविल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. मात्र तीन महिने उलटूनही चौकशीत प्रगती न झाल्याने चौकशी रखडली आहे.
My news Daily Pudhari...22-07-2018

‘हायमास्ट’ घोटाळ्याची होणार चौकशी!
by
Kedar Bhope
- 12:49 AM
‘हायमास्ट’ घोटाळ्याची होणार चौकशी!
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात लावण्यासाठी देण्यात येणार्या हायमास्ट दिव्यांच्या प्रक्रियेला घोटाळ्याचा ‘वास’ येऊ लागल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी हायमास्ट दिव्यांची खरेदी प्रक्रिया, निविदा प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून, त्यानुसार दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
My news Daily Pudhari...21-07-2018

झेडपीच्या 'हायमास्ट'ला 'घोटाळ्याचा वास'!
by
Kedar Bhope
- 7:17 PM
झेडपीच्या 'हायमास्ट'ला 'घोटाळ्याचा वास'!
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात लावण्यासाठी देण्यात येणार्या हायमास्ट दिव्यांच्या प्रक्रियेला घोटाळ्याचा वास येऊ लागला आहे. जवळपास 430 हायमास्टच्या खरेदीसाठी एकत्रित ई-निविदा काढण्याची गरज असतांना 16 पेक्षा जास्त दुकानदारांच्या नावाने स्वतंत्र निविदा काढून दिव्यांची खरेदी करण्यात आली आहे. जास्त खरेदी केल्यास बाजारभावापेक्षा 15 ते 20 हजार रुपयांनी कमी दरात दिवे मिळाले असते. मात्र स्वतंत्र निविदा काढत दिव्यांच्या किमती वाढविल्याचा आरोप होऊ लागला आहे.
My news Daily Pudhari... 20-07-2018

29 गुरुजींची तब्येत एकदम 'ठणठणीत'!
by
Kedar Bhope
- 8:57 PM
29 गुरुजींची तब्येत एकदम 'ठणठणीत'!
बदल्यांच्या वेळेस अपंग प्रमाणपत्र जोडलेल्या 134 पैकी 29 गुरुजींची तब्येत एकदम ‘ठणठणीत’ असल्याचे जिल्हा रुग्णालयाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. या 29 गुरुजींना कारवाईची अंतिम नोटीस पाठवून कारवाई करण्यात येणार आहे.
My news Daily Pudhari... 17-07-2018

आ. अरुण जगताप पोलिसांना शरण...
by
Kedar Bhope
- 7:48 PM
आ. अरुण जगताप पोलिसांना शरण...
पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी आ. अरूण जगताप व ओंकार गिरवले हे दोघे तब्बल तीन महिन्यांनंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात शरण आले. त्यांच्यावर अटकेची कारवाई करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर लगेचच वकिलांनी अर्ज केल्यानंतर न्या.एस.डी.पाटील यांनी त्यांना प्रत्येकी 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
My news Daily Pudhari...14-07-2018
#Ahmednagar #Crime

555 शेतकर्यांना मिळणार कडबाकुट्टी यंत्र
by
Kedar Bhope
- 7:29 PM
555 शेतकर्यांना मिळणार कडबाकुट्टी यंत्र
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकर्यांना 50 टक्के अनुदानावर 555 शेतकर्यांना कडबाकुट्टी यंत्र मिळणार आहे. त्यासाठी 50 लाखांच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी 30 लाखांचा निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.
My news Daily Pudhari 10-07-2018

आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल...
by
Kedar Bhope
- 7:16 PM
आठ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल...
केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकार्यांनी शुक्रवारी न्यायालयात आठ आरोपींच्या विरोधात 1366 पानी दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपींमध्ये आ. संग्राम जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा समावेश नसला तरी, सीआरपीसी 173 (8) नुसार कारवाईची तजवीज ठेवण्यात आल्याने या दोघांविरोधात नंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होऊ शकते. याप्रकरणी आज सुनावणी होईल.
My news Daily Pudhari...07-07-2018
#Ahmednagar #Kedgaon #Murder #Crime